‘फी’ माफ करतो म्हणत वकिलाचा महिलेवर अत्याचार!

Akola News: Lawyer abuses woman saying fee is forgiven!
Akola News: Lawyer abuses woman saying fee is forgiven!
Updated on

शेगाव-अकोला : अकोल्यातील वकीलाने जमीन केस प्रकरणाची ‘फी’ माफ करतो म्हणत एका महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पिडीत महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून शेगाव पोलिसांनी अकोल्याच्या वकीलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

जमीनी संदभार्तील केसचे प्रकरण अकोला पिसे नगर येथील वकील प्रविण महादेव तायडे यांच्याकडे पिडीत महिलेने दिले होते. संबधित जमिनीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी वकील पिडीत महिलेसोबत विविध ठिकाणी जात होते. कामानिमित्त त्यांचा परिचय वाढल्याने वकील हा पिडीत महिलेच्या घरी जात होता.

वकील व पिडीत महिला हे २०१६ पासुन एकमेकांच्या संपर्कात होते. २०१६ ते २०२० यादरम्यान वकील प्रविण तायडे याने शेगांव येथील हॉटेल साई गजानन बुक केले. पिडीत महिलेला केस बद्दल चर्चा करू असे म्हणुन लॉजवर नेले व तुम्हाला फि माफ करतो असे म्हणुन जवळ येऊन पिडीत महिलेशी जबरदस्ती करू लागले.

पिडीत महिला आरडाओरडा करु लागली असता तिला जिवे मारण्याची धमकी देवून शारिरीक संबध ठेवले. याबाबतची तक्रार पिडित महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून आरोपी वकिलाविरुद्ध अ.प.नं ३९६/२० कलम ३७६ (२) (ठ) ५०६ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.